सुधीर गोखले
सांगली : मिरज शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक हिसंपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ऐतिहासिक अशा मिरजेतील गणेश तलावामध्ये मिरजेतील बहुतांशी गणेश मुर्त्यांची विसर्जन होत असते मात्र मिरजेच्या भूतपूर्व संस्थानिक गंगाधर पटवर्धन यांनी ऐन गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या तळ्याच्या प्रवेश द्वारावर हा गणेश तलाव आपल्या खाजगी मालकीचा असल्याची पाटी लावून या हा तलावालाच टाळे ठोकल्याची घटना घडल्याने तातडीने मनपा आयुक्त सुनील पवार यांनी या तलावाची पहाणी केली.
यासंदर्भात आमचे ‘सहकारनामा’ प्रतिनिधिंनी मिरजेच्या संस्थानिकांचे वकील श्रीकृष्ण पोतकुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले कि, हा तलाव मुळातच मिरजेचे संस्थानिक गंगाधरराव पटवर्धन यांच्या खाजगी मालकीचा आहे साधारण दहा वर्षांपूर्वी श्रीमंत गंगाधर पटवर्धन यांनी प्रशासनाबरोबर या तलावाच्या देखभाल दुरुस्ती संदर्भात करार केला होता या कराराची मुदत या वर्षी जून महिन्यात संपुष्टात आली.
त्यानंतर महापालिका प्रशासनाशी या कराराच्या नूतनीकरणाच्या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावाही केला पण कोणताही अभिप्राय प्राप्त न झाल्याने आम्ही नाईलाजाने आज गणेश तलावाच्या प्रवेशद्वारावर मालकी हक्काची पाटी लावली आहे मात्र गणेश विसर्जन परंपरे मध्ये कोणताही अडथळा येणार नाही हि परंपरा सुरु राहील. असेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले मात्र गणेश उत्सवाच्या आधी विसर्जन व्यवस्थेसाठी मनपा ला अडचणीना सामना करावा लागणार आहे.