राष्ट्रीय हरित सेना, शेठ जोतिप्रसाद विद्यालयाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्पर्धा संपन्न

दौंड : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेठ जोतिप्रसाद विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने शाडू मातीच्या कच्च्या गणेशमूर्तींना पर्यावरण पूरक रंग देणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दौंड नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निर्मला राशिनकर यांचे शुभ हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया, चेअरमन विक्रम कटारिया, प्रशालेचे प्राचार्य सत्यदेव खाडे, कन्या प्रशालेच्या प्राचार्या समिना काझी, पर्यवेक्षक मोहन खळदकर, दौंड नगरपालिकेच्या तृप्ती साळुंखे ,शिवभक्त भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय हरित सेनेचे पथक प्रमुख प्रमोद काकडे हे गेल्या 14 वर्षापासून पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणपती बनवण्याची कार्यशाळा तसेच शाडू माती गणेशमूर्ती रंगवणे स्पर्धा घेत आहेत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जाणीव व जागृती निर्माण होऊन विद्यार्थ्यांची बालमने पर्यावरण संवेदनशील व्हावीत या उद्देशाने ही कार्यशाळा व स्पर्धा आयोजित केली जाते दौंड शहरातील शिशु विकास मंदिर, राज्य राखीव पोलीस पब्लिक माध्यमिक विद्यालय, अग्रवाल माध्यमिक विद्यालय, श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय, शेठ जोतिप्रसाद विद्यालय, श्री मंगेश मेमोरियल स्कूल, जनता माध्यमिक विद्यालय, मेरी मेमोरियल हायस्कूल आधी प्रशालेतील 33 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या तयार झालेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रशालेतील बाल गणेश मंडळांना मोफत वितरित करण्यात येणार असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या बालगणेश मंडळांमध्ये स्वर्गीय कि.गु. कटारिया उर्फ बाबूशेठ बोरीकर यांच्या स्मरणार्थ पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा 2022 ही घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय हरित सेना पथक प्रमुख प्रमोद काकडे यांनी दिली.

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील , कलाशिक्षक विजय बारवकर, उपशिक्षक शिवाजी रसाळ ,सुग्रीव कांबळे, उदय गोलांडे, राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी आदित्य लोंढे, कुशल बोरा यांनी सहकार्य केले. शहरातील प्रसिद्ध मूर्तिकार नितीन अष्टेकर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.