जवाहरलाल इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये गणराया विराजमान

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे असणाऱ्या जवाहरलाल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहा दिवसांच्या गणेशोत्सवानिमित्त आज गणरायांचे आगमन झाले. यावेळी नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेळके-पाटील, सचिव धनाजी शेळके-पाटील, प्राचार्य भिसे सर, साधु सुळ सर व इतर सर्व शिक्षक-शिक्षिका, पदाधिकारी उपस्थित होते.

या शाळेमध्ये दरवर्षी गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येकवर्षी वेगवेगळे देखावे केले जातात. या वर्षीही गणेश उत्सवनिमित्त या ठिकाणी इस्रो च्या रॉकेटची छोटी प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.

इस्रो च्या या प्रतिकृतीची संकल्पना कलाशिक्षक गजानन लोणकर व शेखर थरकार यांनी केली आहे. यामधुन विद्यार्थ्यांना वैज्ञानिक माहिती मिळावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा देखावा तयार करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य अरूणा शेळके यांनी दिली.