FRP नंतर आता (महसुली विभागणी सूत्रानुसार) RSF न देणाऱ्या कारखान्यांची काळी यादी जाहीर करा : रयत क्रांती संघटनेची मागणी



दौंड : ईतिहासात पहिल्यांदाच (FRP) एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांना काळया यादीत टाकण्यात आले आहे हे स्वागतार्ह आहे, आता RSF न देणाऱ्या कारखान्यांची काळी यादी जाहीर करावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी राज्याचे साखर आयुक्त श्री गायकवाड यांना लेखी निवेदनातद्वारे केली आहे.

या निवेदनामध्ये शिंदे यांनी, आपण नुकतेच महाराष्ट्रातील वेळेवर एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांचे वर्गीकरण करून तब्बल 44 साखर कारखान्यांना काळया यादीत समाविष्ट केले आहे त्याबद्दल रयत क्रांती संघटना व उत्पादक शेतकर्‍यांच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे असे नमूद करण्यात आले असून आपण लवकरच महसुली विभागणी सूत्रानुसार निघणाऱ्या (RSF) चे पैसे न देणाऱ्या साखर कारखान्यांची सुद्धा काळी यादी त्वरित जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

सन 2016-17 सालातील एकूण 24 कारखान्यांनी 160 कोटी रुपये अधिक 15% टक्के व्याज थकविले होते. त्यानंतर सुद्धा आर्थिक वर्षानंतर निघणारे महसुली उत्पन्नाचे 70/30 नफ्यातील 70% रक्कम  अद्याप कारखानदारांनी शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे आपण त्वरित या कारखान्यांची काळी यादी जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा प्रकारचे लेखी निवेदन व विनंती माजी ऊस दर नियंत्रण मंडळ सदस्य व संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी राज्याचे साखर आयुक्त श्री. गायकवाड यांना केली आहे.