माजी आमदार ‘रमेश थोरात’ गटाला केडगाव मध्ये धक्का, प्रमुख कार्यकर्त्यांचा आमदार ‘राहुल कुल’ गटात प्रवेश

सहकारनामा पोलिटिकल

दौंड : माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटाला आज केडगावमध्ये धक्का बसला आहे. केडगाव येथील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीमध्ये कुल गटात प्रवेश केला आहे. ग्रामपंचायत निवडणूकीच्या वातावरणात हा थोरात गटाला धक्का मानला जात आहे.

आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीमध्ये केडगाव येथील ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव गरदडे , तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष कानिफ विधाते, दत्तात्रय किसन सुळ, नायकोबा किसन गरदडे या थोरात गटातील महत्वाच्या कार्यकर्त्यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

या कार्यकर्त्यांनी भाजप कुल गटात प्रवेश केल्यानंतर पुढील कालावधीमध्ये आमदार राहुल कुल यांच्या सोबत कायम राहणार असल्याचे जाहीर केले. कार्यकर्त्यांच्या प्रवेशावेळी केडगाव आणि परिसरातील कुल गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.