दौंड शहरातील विविध विकास कामांसाठी अजित पवारांकडून 5 कोटीचा निधी : बादशाह शेख

दौंड : दौंड शहराचा सर्वांगिण विकास होऊन येथील नागरिकांना सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड नगरपालिकेला 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती दौंड नगरपालिकेतील राष्ट्रवादी- शिवसेना युतीचे गटनेते बादशहा शेख यांनी दिली.
बादशहा शेख व युतीच्या नगरसेवकांनी शहर विकासासाठी निधी मिळावा म्हणून मा. आमदार रमेश थोरात व जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्याकडे मागणी केलेली होती. या दोघांनी या मागणीसाठी अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला आणि अजित पवार यांनी नगरपालिकेस वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत 2 कोटी 75 लाख रु.व विशेष रस्ता अनुदानातून 2 कोटी 25 लाख रू चा निधी उपलब्ध करून दिला. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून सदरच्या निधीतून शहरातील विकास कामे लवकर सुरू व्हावीत म्हणून प्रयत्नशील असल्याचे बादशहा शेख व पक्षाचे शहराध्यक्ष गुरुमुख नारंग यांनी सांगितले.
शहरातील गाव वेस परिसरातील चैतन्य हनुमान मंदिर विकसित करणे, संरक्षक भिंत व आखाडा बांधणे(75 लाख), हिंदू बेस्तर समाज बहुउद्देशीय इमारत बांधणे(25 लाख),
प्र. क्र.5 मधील प्रबोधनकार शंकरराव सोनवणे सभागृह दुसरा मजला बांधणे(25 लाख),प्र.क्र.7- आयेशा मशिद संरक्षक भिंत बांधणे,प्र.7/8 दत्त मंदिर सभामंडप बांधणे, जय हरी चौक देवीचे मंदिर सभामंडप बांधणे, सय्यद बाबा दर्गा सभामंडप बांधणे(25 लाख),प्र. क्र.11- शिवछत्रपती उद्यान विकसित व सुशोभित करणे(50 लाख),प्र. क्र.12- भोईटे नगर येथे पथदिवे बसविणे, खुली व्यायाम शाळा तसेच महात्मा फुले पुतळ्यास सुशोभिकरण करणे(25 लाख),प्र.क्र.3- इंदिरानगर येथे वाचनालय बांधणे, भीमा नदी नवीन घाट विकसित करणे, विठ्ठल मंदिर सुशोभित करणे(25लाख) या कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे.