सहकार न्यूज
दौंड : भीमा – पाटस कारखान्याचे पहिल्या पंधरवड्याचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आ. राहुल कुल यांनी दिली आहे.
आमदार राहुल कूल यांनी दिलेल्या माहितीनुसार भीमा-पाटस कारखान्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या ३५ हजार टनाचे २५०० रुपये प्रति टनाप्रमाणे पाहिल्या हप्त्याचे नऊ कोटी रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. ऊस तोडणी वाहतुकीचे बिलही प्रत्येकी दहा दिवसानंतर अदा करण्यात आलेले आहे. कारखान्याने दि.५ जानेवारी अखेर ५५ हजार टनाचे गाळप केले असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी उस उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.