कला केंद्राच्या परिसरात हवेत गोळीबार, चौघांवर गुन्हा दाखल

दौंड : दौंड तालुक्यातील चौफुला येथे असणाऱ्या अंबिका कला केंद्राच्या परिसरामध्ये हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आता यवत पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अंबिका कलाकेंद्राचे मॅनेजरने फिर्याद दिली आहे.

दौंड तालुक्यातील चौफुला येथे असणाऱ्या या कला केंद्राच्या परिसरामध्ये हा गोळीबार झाला होता. लावणी कार्यक्रम संपल्यानंतर आपली इमेज दाखविण्यासाठी एका बहाद्दराने हा गोळीबार केला असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी चंद्रकांत मारणे, गणपत जगताप, बाबासाहेब मांडेकर यांसह अन्य एकावर गुन्हा दाखल केला आहे.

दौंड तालुक्यातील चौफुला परिसरात तीन कला केंद्र आहेत त्यापैकी नेमका कोणत्या कला केंद्रामध्ये गोळीबार झाला याची खात्री होतं नव्हती मात्र पोलिसांनी तिन्ही कला केंद्रामध्ये जाऊन चौकशी केल्यानंतर अंबिका कलाकेंद्रामध्ये गोळीबार झाला असे निष्पन्न झाले आणि यातील चार आरोपिंवर गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.