माजी आमदार महादेव बाबर यांसह 8 पोलिसांवर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांसह कोंढवा पोलीस स्टेशनमधील 8 पोलिसांवर ऍट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांचाही समावेश आहे. न्यायालयाच्या आदेशावरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एका मासे विक्रेत्याला भारत बंद चे कारण देऊन मासे विकू नको असे म्हणून महादेव बाबर यांनी त्यास शिवीगाळ व दमदाटी केल्याचे मासे विक्रेत्याचे म्हणणे होते व त्याची तक्रार देण्यास तो कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गेला होता. यावेळी त्यास तेथेही शिवीगाळ करण्यात आल्याचे त्याचे म्हणणे होते व त्याने दाद मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

याप्रकरणी न्यायालयाने माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक, नारायण लोणकर, अब्दुल बागवान, अस्लम बागवान, राजेंद्र बाबर, दीपक रमाणी, सईद शेख, राजू सय्यद, गुन्हे निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहायक पोलिस निरीक्षक मोहिते, पोलीस कर्मचारी कामथे, गरुड, नदाफ, सुब्बानवाड, सुरेखा बडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे.