दौंड : ब्रेकिंग बातम्या देण्यात हातखंडा असणाऱ्या ‘सहकारनामा’ ने काही बातम्या देताना तितकाच सय्यम सुद्धा पाळलेला आहे. त्यामुळे एखादी संशयास्पद घटना असेल तर ‘सहकारनामा’ कोणतीही घाई न करता ‘लेट पण थेट’ बातमी देऊन त्या घटनेचा मागमूस काढून शोध पत्रिका करत आला आहे. आणि याचा प्रत्यय पारगाव ता. दौंड येथील सात जणांच्या हत्येवेळी ‘सहकारनामा’ च्या वाचकांना आला आहे.
सात जणांची आत्महत्या आहे या मथळ्याखाली अनेक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी बातमी केल्यानंतर केवळ सहकारनामा ने या आत्महत्या नसून हत्याच असल्याची शंका उपस्थित करत या घटनेचा शोध पत्रकारितेतून पाठपुरावा केला होता आणि नंतर सत्य सर्व जगासमोर उघड झाले होते. त्यामुळे काही घटना आम्ही फक्त ब्रेकिंगच्या मागे न लागता त्याचा छडा लागल्यानंतरच देत असतो आणि त्यातीलच एक बातमी म्हणजे यवत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार संदीप उर्फ संभाजी कदम यांची आहे.
पोलीस हवालदार संदीप कदम यांचा मृत्यू अपघाताने झाला असून पोलीस तपासात सर्व बाबी तपासल्यानंतर आता याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम बारामती पोलीस ठाण्यात सुरु आहे. पोलीस हवालदार संदीप कदम यांचा दी.22 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान अपघात झाला होता. त्यांच्यावर बारामती आणि नंतर पुणे आणि पुन्हा बारामती येथे खाजगी दवाखान्यात उपचार केले जात होते. मात्र दुर्दैवाने आज त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
कदम हे पुणे ग्रामीण मध्ये आपल्याला मनमिळावू स्वभाव आणि गुन्ह्यांच्या पाठपुराव्या प्रति परिचित होते. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे. कदम यांचा मृत्यू अपघातानेच झाला असून सध्यातरी पोलीस तपासामध्ये काहीही संशयास्पद आढळले नाही. मात्र काही संशयास्पद आहे का त्या दृष्टीनेही तपास केला जात असल्याची माहिती बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तायडे यांनी ‘सहकारनामा’ शी बोलताना दिली आहे.