दौंड : दौंड तालुक्यातील बोरिबेल येथे जावयाने किरकोळ बाचाबाचितून आपल्या सासऱ्याचा खून केल्याची घटना घडली आहे. याबाबत रहीना बाबूजी चव्हाण हिने फिर्याद दिली असून दौंड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी लकझऱ्या कोब्या काळे (रा.लासुर्णे, ता. इंदापूर जि. पुणे) हा बोरिबेल येथे सासरवाडीला आला होता. त्यावेळी फिर्यादीचे सासरे सुदाम हिऱ्या चव्हाण यांनी तुझे माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवतो आणि तू आमच्या घरी येऊन जेवतो असे म्हणून लकझऱ्याला शिवीगाळ करून त्याला हातातील दगड फेकून मारला.
यावेळी लकझऱ्या याला फिर्यादीने समजावीण्याचा प्रयत्न केला मात्र लकझऱ्या याने आपल्याकडे असणाऱ्या मोठ्या चाकू (जंब्या) ने सासऱ्याच्या छातीमध्ये जोरात चाकू खुपसला. सुदाम चव्हाण याला यात गंभीर जखम झाली आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने तो बेशुद्ध झाला. यावेळी लकझऱ्या हा येथून पळून जाण्यात सफल झाला.
यानंतर नातेवाईकांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत मोटरसायकलवर बसवुन दौंड येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी सुदाम चव्हाण यांना तपासून मृत घोषित केले. दौंड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरु आहे.