पाकिस्तानला जरी विचारले की शिवसेना कोणाची तर तोही सांगेन ! 40 गद्दार गेले तरी फरक पडत नाही, पण…

पाचोरा : आज पाचोऱ्यामध्ये मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जंगी सभा पर पाडली ज्यामध्ये त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला, शिवाय निवडणूक आयोगालाही कानपिचक्या दिल्या.

उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच पाकिस्तानला जर विचारले शिवसेनेचा कोणाची तर तोही सांगेन पण आमच्या निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झाला आहे त्यामुळे त्यांना हे दिसत नाही. गुलाबराव पाटलांचे नाव न घेता त्यांनी, काहीजणांना वाटले होते की तेच शिवसेना आहेत त्यामुळे ते सभेत घुसण्याची भाषा करत होते आणि त्यामुळे मी जास्तवेळ घेतला पण यांचं काही घुसण्याचं धाडस झालेलं दिसत नाही. मला 40 गद्दार, हरामखोर गेले तरी फरक पडत नाही पण आर.ओ. तात्यांसारखा एक सहकारी गेला तर त्यांची मात्र उणीव भासते असे संगितले.

पुढे बोलताना त्यांनी, तुम्ही निवडून आले पण तुम्हाला निवडून देणारे हात आमच्याकडे आहेत. त्यामुळे आता गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी जर खरं बोललं की त्यांच्यामागे ससेमीरा लावतात. हे अवकाळी आलेलं सरकार आहे, शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले का? हे आधी त्यांनी पहावं आणि मग विकासाच्या शेतकरी हिताच्या गप्पा मराव्यात. ही गद्दार ढेकणं आहेत आणि ढेकणं मारायला तोफ लागत नाही तर त्यांना मारायला एक बोट खूप आहे. माझ्याकडे काही नसताना तुम्ही (जनता) माझ्यासोबत आलात ते तुम्ही घेणारे नाहीत तर आशीर्वाद देणारे आहेत आणि तुमच्या आशीर्वादाने यांना यांची दाखवून देऊ. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु आहेत. युवकांपासून ते वृद्धांपर्यंत शेतकरी आत्महत्या करत आहेत. याला जबाबदार हे सरकार आहे.
पण सरकारबद्दल बोललं की गुन्हा दाखल केला जातो. जम्मू काश्मीरचे मा.राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी खरं सांगितलं आणि लगेच त्यांच्यामागे सीबीआय लावली हे यांचं दबावतंत्र आहे. आमच्यात असले की भ्रष्ट आणि तुमच्यामध्ये आले की शुद्ध… मग आमच्यात असताना ते भ्रष्ट कसे असतील पण या सर्वांचे उत्तर एका वाक्यात सांगायचे म्हणजे यांना भारतात भाजप शिवाय दुसरा पक्ष ठेवायचाच नाही.

महाविकास आघाडीच्या मंत्री, नेत्यांवर ईडी, सीबीआय लावून त्यांना आत टाकण्याचे षडयंत्र सुरु आहे. राहूल गांधी यांनी अडाणीवरून प्रश्न विचारले म्हणून त्यांच्यासोबत काय केलं जातंय तुम्ही पाहताय. पाचोऱ्यातील त्या गद्दाराला तुम्हाला गाडावं लागेल. मी काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेलो की हे म्हणतात मी हिंदुत्व सोडलं.. मग 3 वर्षात एक अशी गोष्ट सांगा ज्यात मी हिंदुत्व सोडलं आहे किंवा तुम्हाला जाणवलं आसेल. पण माझं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे. जाणवं, शेंडीचं हिंदुत्व नाही. महिलांवर अत्याचार होतायत, त्यांना रस्त्यात अडवून मारलं जातं हे यांचं हिंदुत्व आहे. लोकांना मारणे, त्रास देणे हे हिंदुत्व असूच शकत नाही असा घनाघात उद्धव ठाकरे यांनी करत शिंदे – फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला.