माधुरी काकडे यांना ‘पर्यावरण रत्न’ पुरस्कार

दौंड : निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राळेगणसिद्धी येथे संपन्न झालेल्या पाचव्या पर्यावरण संमेलनाच्या निमित्ताने पर्यावरण रत्न पुरस्काराचे वितरण विजयादशमी या दिवशी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी मंडळाचे राज्य अध्यक्ष प्रमोद मोरे, राज्य कार्याध्यक्ष प्रमोद काकडे,राज्य उपाध्यक्ष प्रकाश केदारी, मंडळाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष तुकाराम अडसूळ, पुणे जिल्हाध्यक्ष मारुती कदम आदी मान्यवर उपस्थित होते. पर्यावरण रत्न पुरस्कार उपशिक्षिका माधुरी काकडे , उपशिक्षक संजय पठाडे ,आदर्श शिक्षक तुकाराम अडसूळ, ज्योती भोर, रामदास नरसाळे, गांजी भोयरे गावाच्या आदर्श सरपंच अनिता बाचकर यांना देण्यात आले.

सदर पुरस्कार हे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसूळ यांनी दिली उपशिक्षिका माधुरी काकडे यांनी सृष्टीकाव्य ह्या संपूर्ण पर्यावरणावर आधारित अश्या स्वलिखित काव्यसंग्रहातून काव्याच्या वेगवेगळ्या प्रकारातून पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन याबाबत समाजात प्रबोधन केल्याबद्दल त्यांना हा पर्यावरण रत्न पुरस्कार देण्यात आला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी दिली.