Encontrar : जम्मू-काश्मीर येथील तिघांच्या बनावट एन्काऊंटर प्रकरणी लष्करी अधिकाऱ्यासह 3 जणांवर आरोपपत्र दाखल



राष्ट्रीय –

जम्मू-काश्मीर मधील शोपिया जिल्ह्यामध्ये झालेल्या तीन जणांच्या बनावट एन्काऊंटर प्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह तीन जनांविरोधात स्थानिक न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

जुलै महिन्यामध्ये 3 तरुणांचा लष्कराकडून एन्काऊंटर करण्यात आला होता. सदर एन्काऊंटर हे बनावट असल्या बाबत माहिती समोर येत असून पोलिसांनी लष्कराच्या राष्ट्रीय रायफलचे कॅप्टन भूपिंदर, बिलाल अहमद आणि तबीश अहमद यांना यात दोषी धरले आहे. संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर संबंधितांवर कोर्ट मार्शल खटला चालवला जाईल असे लष्कराच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.  

जम्मू-काश्मीर च्या शोपिया जिल्ह्यातील असीमपुरा येथील हे 3 तरुण होते, ज्यांना दहशतवादी ठरवून त्यांचा   एन्काऊंटर करण्यात आला होता. हा एन्काऊंटर बनावट असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी स्थानिकांनी लावून धरली  होती. 

या सर्व प्रकारानंतर  सप्टेंबर महिन्यात न्यायालयीन चौकशी पूर्ण झाली असून सदर एन्काऊंटर करताना लष्कराने आपल्या अधिकाराचे उल्लंघन केले असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.