केडगाव (दौंड) : दि. 19 जुलै रोजी केडगाव विकास सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक पार पडली. यावेळी वैजनाथ अनंता गायकवाड यांची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी श्रीमती कमल रखमाजी गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवड प्रक्रियेमध्ये ए.आर साखरे आणि केडगाव विकास सोसायटीचे सचिव शहाजी लोणकर उपस्थित होते. वैजनाथ गायकवाड आणि श्रीमती कमल गायकवाड यांची निवड होताच उपस्थितांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी माजी जिल्हा परिषदच सदस्य बाळासो कापरे यांसह सोसायटीचे आजी-माजी चेअरमन व्हा.चेअरमन, संचालक मंडळ उपस्थित होते.