जमिनीच्या वाटणीवरून ‘केडगाव’ येथे दोन पुतण्यांकडून वृद्ध चुलत्याला मारहाण

दौंड : जमिनीच्या वाटणीवरून वृद्ध चुलत्याला दोन पुतण्यांनी काठीने मारहाण केल्याची घटना केडगाव येथील पाटील निंबाळकरवस्ती येथे घडली आहे. या मारहाण प्रकरणी दोन्ही पुतण्यांवर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.9 एप्रिल रोजी दुपारी 2:00 वाजण्याच्या सुमारास केडगावच्या हंडाळवाडी-पाटील निंबाळकर वस्ती (ता.दौड) येथील शेतजमीन गट नं. ९८/१४ येथे फिर्यादी रामचंद्र धोंडिबा जगदाळे (वय 66, रा.केडगाव पुनर्वसन ता.दौंड) व त्यांच्या दोन बहीनी सुंदराबाई ज्ञानोबा पासलकर, विमल श्रीपती कोळपे, मुलगा अजिक्य जगदाळे असे जमीनीची वाटणी करण्यासाठी आले असता जमीनीचे वाटणीचे कारणावरून त्यांचा पुतण्या गणेश हरेश्वर जगदाळे याने फिर्यादी यांच्या तोंडावर फाईट मारली तर दुसरा पुतण्या सोमनाथ हरेश्वर जगदाळे (दोन्ही रा.हडपसर, भोसले व्हिलेज फुरसुंगी,पुणे) याने त्याच्या हातातील लाकडी काठीने फिर्यादी यांच्या कमरेखाली मारहान केली.

पुतण्यांकडून चुलत्याला मारहाण होत असताना त्यांना सोडवण्यासाठी फिर्यादी यांचे मेहुने श्रीपती नारायण कोळपे हे आले असता गणेश जगदाळे याने त्यांच्या डावे हाताच्या
कोपरावर काठीने मारहान केली व तुम्ही जर पुन्हा शेतात आला तर तुमचे हातपाय काढतो असा दम देवुन शिवीगाळ करत तेथुन निघुन गेले. या घडलेल्या प्रकारबाबत रामचंद्र जगदाळे यांनी फिर्याद दिल्याने सोमनाथ जगदाळे व गणेश जगदाळे यांच्यावर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोह.गाडेकर करीत आहेत.