Categories: देश

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी (ED) कडून अटक

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे. सलग 9 समन्स पाठवल्यानंतर ईडीची टीम गुरुवारी संध्याकाळी 10 व्या समन्ससह केजरीवाल यांच्या घरी पोहोचली. मुख्यमंत्र्यांची येथील निवासस्थानी दोन तास चौकशी करण्यात आली. यावेळी ईडीचे सहसंचालक कपिल राज हेही केजरीवाल यांच्या निवासस्थानी उपस्थित होते.

पीएमएलएच्या कलम ५० अंतर्गत केजरीवाल यांचे जबाब नोंदवण्यात आले. ईडीचे तपास अधिकारी जोगेंद्र सीएम केजरीवाल यांची चौकशी करत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घराचीही झडती घेण्यात आली. दरम्यान, केजरीवाल यांच्या कायदेशीर पथकाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, दिल्लीचे कॅबिनेट मंत्री सौरभ भारद्वाजही केजरीवाल यांच्या घराबाहेर पोहोचले आणि त्यांनी केजरीवाल यांना अटक करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले.

आज दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली होती आणि सीएम केजरीवाल यांना अटकेपासून दिलासा मिळत नसल्याचे सांगितले होते. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे की, ‘भाजपची राजकीय टीम (ईडी) केजरीवाल यांच्या विचारसरणीला अटक करू शकत नाही… कारण फक्त ‘आप’च भाजपला रोखू शकते… विचार कधीही दडपला जाऊ शकत नाही.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

11 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago