केडगाव / दौंड : दौंड तालुका आणि खासकरून केडगाव परिसरामध्ये गौरी गणपती सणानिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या सणानिमित्त विविध वस्तू खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्याचे पहायला मिळत आहे.
परवा अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठ व कनिष्ठ गौरी यांचे घरोघरी आगमन झाले. काल ज्येष्ठ नक्षत्रावर त्यांचे विधिवत पूजन होऊन त्यांना सोळा प्रकारच्या भाज्या पाच प्रकारच्या कोशिंबिरी पुरणपोळी याचा नैवेद्य दाखवण्यात आला.
आज मूळ नक्षत्रावर त्यांचे विधिवत विसर्जन होणार असून या गौरी गणपतीच्या सणामुळे सर्व बाजारपेठेमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सजावट आणि विविध वस्तू पदार्थांच्या खरेदी विक्रीमुळे प्रत्येकाच्या हाताला काम मिळत असल्याची माहिती प्राध्यापक ओंकार अवचट यांनी दिली आहे. घरातील सजावटीच्या कामात पुरुषांबरोबरीनेच महिलांनी देखील विशेष योगदान दिल्याचे दिसत आहे.