यंदा गणेश विसर्जनावर ‘ड्रोन’ ची नजर | ध्वनी प्रदूषणाबाबत थेट गुन्हे नोंदवण्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिले संकेत

सुधीर गोखले

सांगली : गणेशोत्सव विसर्जन मागार्वर यावर्षी सीसी टीव्हीच्या मदतीला आता ‘ड्रोन’ नजर ठेवणार आहेत. तसेच डॉल्बीचा वाढत चाललेला दणदणाट त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषणाबाबत आम्ही योग्य कारवाई करू तशा सूचनाही आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्या असल्याचे कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगलीतले. 

श्री फुलारी म्हणाले, या वर्षी गणेश विसर्जन आणि मुस्लिम धर्मियांची ईद एकाच दिवशी येत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना सर्व जिल्हा अधीक्षकांना दिल्या आहेतच शिवाय मिरवणुकीत हुल्लडबाजी करणाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘ड्रोन’चीही नजर असेल. तसेच डॉल्बीचा वाढलेला दणदणाट खपवून घेतला जाणार नाही ध्वनी प्रदूषणा बाबत आम्ही कारवाई करणारच आहोत त्याचबरोबर ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर आणि ध्वनी यंत्रणांच्या मालकांवर तात्काळ गुन्हे दाखल केले जातील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

मिरजेची अनंत चतुर्थी ची विसर्जन मिरवणूक हि ऐतिहासिक आहे हि मिरवणूक बघण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून लाखो गणेशभक्त येत असतात श्री गणेश विसर्जन होत असलेला शगणेश तलाव आणि विसर्जन मार्गाचीही त्यांनी पहाणी केली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली, मिरज विभागीय पोलीस अधिकारी प्राणिल गिल्डा, मिरज शहर पोलीस निरीक्षक संजीव झाडे, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, मिरज ग्रामीण चे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख,  मिरज शहर वाहतूक  पोलीस निरीक्षक भगवान पालवे, मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी गजेंद्र कुल्लोळे उपस्थित होते.

यावेळी त्यांनी विसर्जन वाहतूक मार्गावर असलेली विद्युत वाहिन्यांची उंची वाढवणे तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासंदर्भात संबंधित विभागास सूचना दिल्या. गणेश मंडळांनीही पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे तसेच हे दोनही सण शांततेत साजरे करण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही केले.
‘सायबर’ चे नेटकऱ्यांवर बारकाईने लक्ष  नुकत्याच घडलेल्या सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीच्या दुर्दैवी घटनेनंतर या गणेशोत्सवात सायबर सेल चे नेटकऱ्यांवर बारकाईने लक्ष आहे त्यामुळे कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट करू नये तसेच कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने सोशल मीडिया वर लिखाण अथवा पोस्ट करण्याचे टाळावे अन्यथा संबंधितांवर सायबर गुन्हा नोंदवला जाईल असाही इशारा त्यांनी दिला.