दौंड : (अब्बास शेख) जिल्हापरिषद आणि पंचायत समितीची प्रारूप रचना आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. खालील प्रमाणे दौंड तालुक्यातील जिल्हापरिषद गट आणि गण ची प्रारूप रचना देण्यात आली आहे.
राहू गट व गण

ज्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभाग अन्वये पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या प्रारुप प्रभागरचनेबाबत जिल्हाधिकारी पुणे यांच्या दिनांक १४ जुलै च्या आदेशाची मसुदा प्रत खालील प्रमाणे आहे.
वरवंड गट व गण.. तसेच गोपाळवाडी गट व गण

दौंड तालुक्यात अनेक सोशल मिडिया बहाद्दरांच्या पोस्टमुळे नागरिकांमध्ये चुकीची प्रारूप रचना पसरवली गेली होती त्यामुळे एकच गोंधळ उडाल्याचे पाहिले मिळाले.
खडकी गट व गण

पाटस गट व गण

मात्र नागरिकांचा गोंधळ होऊ नये म्हणून सहकारनामाकडून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली प्रारूप रचना येथे देण्यात आली आहे.
बोरिपार्धी गट व गण

यवत गट व गण

असे एकूण सात गट व चौदा गणांची प्रारूप रचना जाहीर करण्यात आली आहे. आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची जी सकारण लेखी निवेदने, हरकती, सूचना, जिल्हाधिकारी यांचेकडे दिनांक २१/०७/२०२५ पर्यत सादर करावेत. उपरोक्त तारखेनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेली निवेदने, हरकती, सूचना इत्यादी विचारात घेतले जाणार नाहीत असे जाहीर करण्यात आले आहे.