सुधीर गोखले
सांगली : यंदाची दिवाळी हि सर्वाना सुखा समृद्धीची जावो अशा आशयाच्या शुभेच्छा देऊन आणि खास करून रुग्णालय आणि महाविद्यालयाची नेहमी दक्षता घेणाऱ्या स्वच्छता राखणाऱ्या चतुर्थ श्रेणीच्या शेकडो कर्मचाऱ्यांना वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. रुपेशकुमार शिंदे यांच्या हस्ते दिवाळी किट चे वाटप करण्यात आले.
समाजसेवा विभागाच्या समन्वयातून शहरातील अनेक दानशूर व्यक्ती व संस्था यांना संपर्क करून दिवाळी किट चे साहित्य मिळविण्यात आले. 130 शिपाई व साफ सफाई कर्मचारी यांना हे किट देण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून कर्मचारी रुग्णालयाची रात्रंदिवस साफसफाई करत असतात त्यामुळे रुग्ण बरे होण्यामध्ये त्यांचा वाटा तेवढाच मोलाचा असतो तरी त्यांची दिवाळी गोड होण्यासाठी मीना मोरू, जीवन ज्योत फाउंडेशन शाखा सांगली यांनी 100 कि, साखर, सुकुमार अण्णा पाटील यांनी 130 जेमिनी कंपनीचे तेलाचे पाकिटे, डॉ प्रमोद दीप सर यांनी 130 साबण, तर स्वतः वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे सर यांनी 130 किलो रवा भेट दिला.
या सर्व सन्माननीय देणगीदार व्यक्ती चे मिरज सिव्हिल रूग्णालय प्रशासन तर्फे आभार मानण्यात आले. या वेळी डॉक्टर रुपेश शिंदे, डॉ.माने, डॉक्टर सेजल, डॉक्टर पॅनीअल, डॉक्टर सौरभ, डॉ.मकरंद, डॉ. श्रेयस, समाजसेवा अधीक्षक सूर्यप्रकाश राऊत आदी उपस्थित होते.