केडगाव (दौंड) : केडगाव (ता.दौंड) येथून आज रविवारी चौरंगीनाथ महाराज पालखी दिंडी चे प्रस्थान झाले. केडगाव स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ही पालखी मुक्कामी होती.
आज सकाळी केडगाव ग्रामपंचायतच्या वतीने पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी पालखी मार्गावर रांगोळी, हार, फुले यांची सजावट करून ग्रामपंचायत गॅलरीमधून चौरंगीनाथ महाराज पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी वारकऱ्यांना फराळ वाटप करण्यात आले.
या पालखी स्वागत कार्यक्रमासाठी गौरव बारवकर, मा. उपसरपंच विद्यमान सदस्य अशोक हंडाळ, ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप, नवनाथ गायकवाड, स्वप्नील राऊत, रेखाताई राऊत, शैलाजी पितळे, राहुल पितळे तसेच सभापती झुंबर गायकवाड व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.