‛रावणगाव’ येथून ‛चांगावटेश्वर’ महाराज पालखीचे पंढरपूरकडे ‛प्रस्थान’

मंगेश गाढवे

रावणगाव : रावणगाव ता. दौंड येथे काल चांगावटेश्वर महाराज पालखीचे आगमन झाले होते. मुक्काम आटोपून आज सकाळी या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

रावणगाव येथे दर वर्षी श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखीचे आगमन होते. या पालखीचे आगमन झाल्यानंतर रात्रीचा मुक्काम हा ठरल्याप्रमाणे रावणगाव येथे होतो. मुक्कामी असलेल्या पालखी मधील वारकऱ्यांसाठी येथील गावकाऱ्यांकडून भाकरी, भाजी इत्यादी जमवून त्यांच्या जेवणाची सोय केली जाते.

जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री कीर्तनाचा कार्यक्रम पार पाडतो. मुक्काम झाल्यानंतर सकाळी चहा व नाश्ता करून पालखीचे टाळ मृदंगाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने पुढील मुक्कामी प्रस्थान होते. यावेळी
गावातील नागरिक, भक्त या दिंडीमध्ये सामील होऊन श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोबत जय हरी विठ्ठल नामाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान करतात.