नन्हूमिया सय्यदभाई शेख यांचे निधन, आयुष्यभर अंधत्वाशी संघर्ष करणाराच्या वाट्याला मृत्युंनंतरही संघर्ष आला

दौंड : केडगाव ता. दौंड येथील रहिवासी नन्हूमिया सय्यदभाई शेख (मुलाणी) यांचे दि. 14 ऑगस्ट रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. त्यांच्यामागे मुलगा जहांगीर शेख, दोन विवाहित मुली, सून, नातू असा मोठा परिवार आहे.

नन्हूमिया यांना वयाच्या दहाव्या वर्षी कायमचे अंधत्व आले होते. मात्र 100% अंधत्व असतानाही त्यांनी आपला पिढीजात पारंपारिक मुलाणकी (गावकीचा) व्यवसाय जपला होता. ते केडगाव तसेच पाटील निंबाळकर वस्ती, 22 फाटा-सोडनवर वस्ती, हंडाळवाडी येथे त्यांचा पारंपारिक मुलाणकी (गावकी) चा व्यवसाय करत होते.

बदलापूर नंतर दौंड तालुकाही हादरला

नन्हूमिया कायमचे अंध असतानाही ते गणित विषयात पारंगत होते. त्यांना कितीही अवघड बेरीज, गुणाकार, भागाकार सांगितला तर ते सेकंदात बोटावर मोजून त्याचे उत्तर द्यायचे तसेच 22 फाटा ते केडगाव गाव असे अंतर ते कुणाचाही आधार न घेता केवळ अंदाजावर एकटेच पायी पूर्ण करायचे.

बारामतीत पुन्हा एका युवकाचा खून

आयुष्यभर अंधत्वाच्या यातना भोगल्या, मरणानंतरही संघर्ष वाट्याला आला

नन्हूमिया सय्यदभाई शेख (मुलाणी) यांचे पणजोबा महंमद भाई हे वाखारी गावचे रहिवासी होते तसेच त्यांच्या वाखारी आणि केडगाव येथे मिळकती होत्या. महंमदभाई यांचा वाखारी आणि केडगाव येथे मुलाणकी (गावकी) व्यवसाय होता. तसेच नन्हूमिया यांचे आजोबा नबीभाई यांची वाखारी येथे जमीन व वडिलोपार्जित रहिवासी घर होते. मात्र याच नन्हूमिया सय्यदभाई शेख (मुलाणी) यांचा दफनविधी केडगाव-वाखारी च्या पारंपारिक स्थानिक मुस्लिम कब्रस्तान, दफनभूमी (वक्फ जमीन गट नं. 2,वाखारी) येथे होताना येथील ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच यांनी मुस्लिम दफनभूमीत वक्फ च्या जागेत दफनविधी अडविल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. वाखारी येथील पारंपारिक मुस्लिम कब्रस्तान, दफनभूमीमध्ये नन्हूमिया यांचे आई, वडील, आजे, पणजे सर्व पूर्वज दफन आहेत. मात्र त्यांना त्या दफनभूमीत दफन करण्यास मोठी आडकाठी निर्माण करण्यात आल्याने अखेर पोलिसांना तेथे येऊन दफनविधी पार पडेपर्यंत थांबावे लागले होते. त्यामुळे ज्या नन्हूमिया यांना आयुष्यात अंधत्वामुळे कायम यातना होत राहिल्या त्या नन्हूमिया यांच्या वाट्याला मृत्यूनंतरही संघर्षच वाट्याला आल्याचे पहायला मिळाले.