चौफुला येथे अनोळखी इसमाचा मृत्यू, यवत पोलिसांचे आवाहन

केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील बोरिपार्धी, चौफुला येथे एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला असून त्याची ओळख पटत नसल्याने यवत पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

याबाबत अब्दुल रजाक माहीन शेख (राहणार बोरीपार्धी ता. दौंड जि. पुणे) यांनी खबर दिली असून, त्यांनी दिलेल्या खबरीनुसार दिनांक ०२/०६/२०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास बोरीपार्धी हद्दीत असणाऱ्या धायगुडेवाडी येथील नॅशनल हॉटेलमध्ये एक अनोळखी बेवारस इसम (वय अंदाजे ५० ते ५५ वर्ष) याच्या अचानक छातीत दुखू लागले.

यानंतर फिर्यादी त्यास औषधोपचार कामी बोरीपार्धी येथील हर्ष हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. सदर अनोळखी इसम हा कोण आहे याची कोणतीच माहिती फिर्यादी यांना नव्हती. त्यामुळे त्यांनी यवत पोलीस स्टेशन येथे याची खबर दिली. मृत व्यक्ती ही अंगाने मजबूत, रंगाने काळा सावळा, अंगामध्ये लाल रंगाचा हाफ बाह्याचा टी-शर्ट त्याच्यावर इंग्रजीमध्ये जिओ ओरिजिनल असे लिहिलेले असून आर्मी रंगाची फुल पॅन्ट आणि मोरपंखी रंगाची इलॅस्टिकची अंडरवेअर नेसलेला असा पेहराव या व्यक्तीचा आहे.

तरी कुणाला या अज्ञात इसमाची माहिती मिळाल्यास अथवा तो कोणाच्या ओळखीचा असल्यास त्वरित बीए गाडेकर (पोलीस उपनिरीक्षक, यवत पोलीस स्टेशन) यांच्याशी ९६३७५४७१२९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यवत पोलिसांनी केले आहे.