दौंड : दौंड शहर आणि परिसरामध्ये सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आता नुसता पाऊसच पडत नसून त्यासोबत निसर्गाकडून मिसाईल हल्ला हि होताना दिसत आहे. ऐकून थोडे चक्रावलात ना पण हे खरं आहे… जसे मानव निर्मित मिसाईल्स, एक देश-दुसऱ्या देशांवर सोडताना आपण पाहतो तशाच प्रकारचा काहीसा विजांच्या नैसर्गिक हल्ल्याचा थरारक अनुभव आज दौंडकरांनी घेतला आहे.
आज दुपारपासूनच दौंड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर ढग दाटून आले होते आणि अचानक विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. दौंड शहरातील विविध भागांमध्ये विजांचा कडकडाट ऐकायला मिळत होता. त्यामुळे हॉटेल आणि ऑफिसेसमध्ये आसरा घेणारे लोक ‛आता हि वीज कुठे न कुठे पडणार’ अशी चर्चा करताना दिसत होते. पावसाचा जोर वाढत असतानाच शहरातील लिंगाळी रोडवर असणाऱ्या बर्फ फॅक्टरी बिल्डिंगवर मिसाईल हल्ला व्हावा तशी कडकडाटात वीज येऊन आदळली. यावेळी पाऊस आणि विजांचे व्हिडीओ बनविणाऱ्या एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये हे सर्व चित्रित झाले आणि पाहता पाहता हा व्हिडीओ अनेक ठिकाणी व्हायरल झाला. तुम्हीही हा निसर्गाचा मिसाईल हल्ला पाहिला नसेल तर खालील निळ्या लाईनवर क्लिककरून तो व्हिडीओ पाहू शकता 👇🏻
दौंड शहरात निसर्गाचा मिसाईल हल्ला ( विजेचा थेट इमारतीवर हल्ला)