Daund : दौंड नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत भव्य सायकल मॅरेथॉन स्पर्धा संपन्न



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत  आज भव्य सायकल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

बोरावके नगर येथून या स्पर्धेचा प्रारंभ होऊन दौंड शुगर कारखाना येथे सांगता झाली. दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शितल कटारिया यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचा प्रारंभ केला. स्पर्धेला खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर स्पर्धा यशस्वी होण्याकरिता दौंड नगर पालिकेचे सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले. 

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दौंड शुगर कारखान्यातील मंगल कार्यालयात संपन्न झाला. प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे जेष्ठ सदस्य दौंड शुगरचे संचालक विरधवल जगदाळे पाटील, नगराध्यक्षा शितल कटारिया, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, गटनेते राजेश गायकवाड, शहानवाज पठाण, जीवराज पवार, प्रमोद देशमुख, डॉ. सिद्धार्थ कुलकर्णी, डॉ.दाते, डॉ. दराडे या सर्वांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. 

प्रथम क्रमांक ओमकार शिंदे, द्वितीय क्रमांक सज्जन पाळक, तृतीय क्रमांक गणेश मोरे यांनी पटकाविला तसेच १८ वर्ष आतील मुली गट, प्रथम क्रमांक : कविता यादव, द्वितीय क्रमांक : प्रांजल वाठारकर, तृतीय क्रमांक : तनुश्री गोयकर, १८ वर्ष आतील मुले गट, प्रथम क्रमांक : साई उदावंत, द्वितीय क्रमांक : अभय शाहू, तृतीय क्रमांक : आदित्य जगताप यांनी पटकावला आहे.