दौंड : सहकारनामा ऑनलाइन
दौंड तालुक्यातील मसनेरवाडी (लिंगाळी) येथे मोठ्या प्रमाणावर भरण्यात येत असलेली म्हस्नोबाची यात्रा यावेळी रद्द करण्यात आली आहे. याबाबत यात्रा कमिटीचे अध्यक्ष काशीनाथ जगन्नाथ जगदाळे, सचिव मुरलीधर धोंडिबा येडे यांनी हि माहिती दिली आहे.
मनसेरवाडी चे ग्रामदैवत असलेल्या म्हस्नोबा यांची यात्रा हि या पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. ती अनेक वर्षांपासून साजरी करण्यात येते मात्र सध्याच्या कोरोना महामारीची पार्श्वभूमी आणि सततचा वाढता प्रार्दुभाव पाहता सोमवार १६ नोव्हेंबर व मंगळवार १७ नोव्हेंबर २०२० रोजी होणारे देवाचा छबिना व मुख्य यात्रा असे दोन्ही कार्यक्रम पूर्णतः रद्द करण्यात आलेले आहेत.
याबाबत यात्रा कमिटीतर्फे यात्रा कमिटी अध्यक्ष व सदस्य यांनी दिनांक ७ नोव्हेंबर २०२० रोजी घेतलेल्या यात्रेच्या आढावा बैठकीत यंदाची यात्रा रद्दबातल करणेकरीता सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेला असल्याचे त्यांनी सांगितले.
या निर्णयात सर्व पै पाहुण्यांना तसेच शेजारील गावातील भाविक भक्तांना यात्रा कमिटी तर्फे या माध्यमातून जाहीर आवाहन करण्यात येत आहे की कोणीही भाविकांनी व नागरीकांनी यात्रेकरीता मंदीर परिसरात येवू नये व आपले सर्व धार्मिक विधिवत पूजा सध्याच्या परिस्थितीचे सामाजिक भान ठेवून धरूनच करावी अशी विनंती करण्यात आली आहे.
तसेच कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास प्रशासना तर्फे कायदेशीर कारवाई करण्यात आल्यास, अशा कारवाईस यात्रा कमिटी जबाबदार राहणार नाही. या सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन ही करण्यात आले आहे.