Daund – विद्यार्थ्यांच्या फी ‛माफी’साठी दौंडमध्ये वंचितचे हलगीनाद ‛आंदोलन’



|सहकारनामा|

दौंड : मागील एक वर्षापासून देशामध्ये सर्वत्र लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या निर्बंधामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय उध्वस्त झाले, भल्या भल्यांचे आर्थिक गणित कोलमडले आणि अशा परिस्थितीतही खाजगी शिक्षण संस्था पालकांकडून पठाणी पद्धतीने भरमसाठ शालेय फी वसूल करीत आहेत. या दुर्दैवी बाबी विरोधात व झोपलेल्या शासन व्यवस्थे विरोधात दौंड शहर व तालुका वंचित बहुजन आघाडी च्या वतीने दिनांक 11 जून रोजी सकाळी 11 वाजता येथील नवीन तहसील कार्यालया समोर हलगी नाद आंदोलन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पालकांनी या व्यवस्थे विरोधात आवाज उठविण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे असे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.