दौंड तालुका खरेदी-विक्री संघाचा निकाल जाहीर, 17 पैकी 16 जागेवर ‘राष्ट्रवादी’ तर 1 जागेवर ‘भाजप’

सहकारवार्ता – अब्बास शेख

दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या 3 जागेसाठी झालेल्या मतदानाचा निकाल जाहीर झाला असून यात 2 ठिकाणी राष्ट्रवादी तर 1 ठिकाणी भाजप ने बाजी मारली आहे. पिंपळगाव आणि पाटस येथे राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकले असून वरवंड येथे भाजपचा उमेदवार जिंकून आला आहे. विशेष म्हणजे पिंपळगाव येथील अपक्ष उमेदवार जगताप यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार टुले यांना जाहीर पाठिंबा दिला असतानाही जगताप 5 मते पडली तर टुले यांना 7 मते पडून त्यांचा विजय झाला आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर 17 पैकी 14 जागा बिनरोध करण्यात माजी आमदार रमेश थोरात यांना यश आले होते. मात्र 3 जागेवर 1 पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज आल्याने तेथे निवडणूक लागली होती.

मतदार संघ, उमेदवार आणि त्यांना पडलेली मते खालील प्रमाणे –

पिंपळगाव : 13 पैकी 12 मतदान झाले त्यामध्ये
मोहन टुले – 7
नारायण जगताप – 5, मोहन टुले 2 मतांनी विजयी

पाटस : 18 पैकी 18 मतदान झाले त्यापैकी
शिवाजी ढमाले – 12
रंजना भागवत – 6, शिवाजी ढमाले 6 मतांनी विजयी

वरवंड : 8 पैकी 8 मतदान झाले त्यापैकी
सचिन सातपुते – 5
संजय धायगुडे – 3
सचिन सातपुते 2 मतांनी विजयी