दौंड : दौंड तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट कैलास गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या वेळी उपाध्यक्ष आणि सचिव यांचीही निवड करण्यात आली आहे.
दौंड तालुका अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या सन 2023-24 च्या वार्षिक निवडणुकीमध्ये अॅडव्होकेट कैलास गायकवाड यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी पोपट गवळी आणि सचिवपदी दत्तात्रय पाचपुते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही कोणताही वाद अथवा गोंधळ न होता पार पडली. असोसिएशनचे मावळते अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले तर अॅडव्होकेट संतोष आढाव यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून आपली जबाबदारी पार पाडली.
अॅडव्होकेट बार असोसिएशन कार्यकारणी पुढील प्रमाणे –
अध्यक्ष- अॅडव्होकेट कैलास गायकवाड
उपाध्यक्ष- अॅडव्होकेट पोपट गवळी
सचिव – अॅडव्होकेट दत्तात्रय पाचपुते
सहसचिव- अॅडव्होकेट शाहूराज शितोळे
खजिनदार- अॅडव्होकेट शरद नरुटे
हिशोबनीस- अॅडव्होकेट संदीप शेलार
ग्रंथपाल- अॅडव्होकेट सुजय मेंगावडे.