VIP गाडीतून शेळ्या चोरी करणाऱ्यांना दौंड पोलिसांनी पाठलाग करून पकडले

दौंड : VIP नंबर असलेल्या होंडासिटी गाडीतून येउन शेळ्या चोरणाऱ्या टोळीला दौंड पोलिसांनी पकडले आहे. याबाबत पृथ्वीराज संपतराव शितोळे (वय 40 वर्षे, धंदा षेती, रा. शितोळेवस्ती कुरकुंभ ता दौंड जि पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. शितोळे यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी आरोपी प्रविण विजय चव्हाण (वय 22 वर्षे, रा. कागल्ली, अकलुज ता माळशिरस जि. सोलापुर)  करण महादेव चव्हाण आणि माउली लोंढे (दोन्ही रा. माळीनगर ता. माळशिरस जि सोलापुर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 03/07/2025 रोजी पहाटे 03ः00 च्या सुमारास फिर्यादीचे कुटुंबीय घरामध्ये झोपलेले असताना त्यांना कुत्रा भुंकल्याचा व शेळी ओरडल्याचा आवाज आला. त्यामुळे फिर्यादी व त्यांचा भाउ अतुल संपतराव शितोळे घराच्या बाहेर येवुन जनावराच्या गोठयाकडे पगेले असता तीन इसम जनावराच्या गोठयातुन शेळया घेवुन जात असताना त्यांना दिसले, तेव्हा त्यांनी मोठयाने आवाज दिला असता चोरटे त्यांच्याकडे असलेल्या चारचाकी गाडीच्या डिकीमध्ये शेळया टाकुन पुणे सोलापुर हायवे रोडने निघुन गेले.

यावेळी शितोळे यांनी दौंड पोलीसांना फोन केला असता तात्काळ घटनास्थळी पोलीस आले आणि त्यांनी माहिती घेऊन शेळ्या घेवुन जाणा-या गाडीचा पाठलाग सुरु केला. यावेळी मळद गावच्या हद्दीमध्ये पहाटे 03.15 च्या सुमारास संशयीत गाडी थांबविली असता शेळया घेवुन जाणा-या गाडीतील दोन इसम अंधारामध्ये पळुन गेले व एकास पोलीसांनी जागीच पकडुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव 1) प्रविण विजय चव्हाण (वय 22 वर्षे, रा. सवतगव्हाण ता माळशिरस जि सोलापुर)  असे सांगीतले तसेच पळुन गेलेल्यांची नावे 2) करण महादेव चव्हाण 3) माउली लोंढे (दोन्ही रा. माळीनगर ता माळशिरस जि सोलापुर) असे असल्याचे सांगीतले तसेच सदरची चोरी आम्ही तिघांनी मिळुन केल्याचे सांगितले.

पोलिसांनी चोरट्यांच्या ताब्यातील चारचाकी गाडीची पहाणी केली असता काळया रंगाची होन्डा सिटी गाडी नं. एम.एच.12/एफ.यु/1000 असा तिचा नंबर दिसून आला तसेच गाडीची डिगी उघडुन पाहीली असता त्यामध्ये फिर्यादी यांच्या चोरलेल्या तीन शेळया मिळुन आल्या. आरोपीला दौंड पोलिसांनी अटक केली असून अन्य दोन आरोपिंचा शोध सुरु आहे. पुढील तपास पोलिस हवालदार पठाण करीत आहेत.