दौंड : विवाह सोहळ्यात गर्दीत फायदा घेऊन नवरिचे दागिने खिशातील पैशांची पाकिटे,
साहित्यावर डल्ला मारणाऱ्या तीन परप्रांतीयांना दौंड पोलिसांनी जेरबंद केले असून त्यात एका महिला गुन्हेगाराचा समावेश आहे.
या टोळीतील दो
न आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
दि २७ रोजी पवार पॅलेस काष्टी रस्त्यालगत एक विवाहसोहळा सुरु असताना निलेश पवार
(रा.सोनवडी ता.दौंड
) यांना काही संशयित गर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याबाबत लक्षात आले. त्यांनी तात्काळ दौंड पोलिसांना माहिती कळविली. दौंड पोलिसांनी तत्काळ पवार पॅलेस मंगल कार्यालय गाठले आणि कार्यालयातील निलेश पवार आणि नागरिकांच्या मदतीने दोन इसम
आणि एका महिलेला शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपींना नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे राज रामनारायण सिसोदिया (वय-२७), बलभीम माकड सिसोदिया (वय-१९), शब्बोबाई प्रतापसिंग सिसोदिया (वय-५०) सर्व (रा. गुलखेड ता. राजगड मध्यप्रदेश) अशी सांगितली. पोलिसांनी दोघांची अंगझडती घेतली असता त्यांनी जबरदस्ती चोरी केलेले पाकीट त्यामध्ये ६ हजार ५००
रुपये हे राज रामनारायण सिसोदिया याच्याजवळ मिळून आले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी 'आमच्यासोबत राहुल रामनारायण सिसोदिया व दिनेशराजे सिसोदिया (रा.रायगड मध्यप्रदेश) हे देखील असल्याचे सांगितले.
आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मध्यप्रदेशातुन महाराष्ट्रात मंगल कार्यालयातील दागिने चोरीसाठी हे इसम येतात. या टोळीने पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चोऱ्या केल्या असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून याबाबत अधिकची काळजी घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभागाचे स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद गटकुळ पोलीस अमलदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, विजय पवार, विशाल जावळे, आदेश राऊत, अमोल देवकाते, सुरेश चौधरी, रवी काळे, अशोक जाधव आदींनी केली आहे.