दौंड : जनसेवा प्रतिष्ठाण दौंडच्या वतीने गणराया अवॉर्ड २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती जनसेवा प्रतिष्ठाणच्या संयोजन समितीने दिली आहे.
दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या संकल्पनेतून तालुक्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात गौरव घडविणाऱ्या गणराया अवॉर्ड २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक गणेशोस्तव मंडळाने आपली माहिती, केलेली सजावट, सामजिक कार्य, हे लिंक मध्ये भरून पाठवायची आहे. तालुक्यातील प्रत्येक गणेश मंडळांचे परीक्षण करण्याकरिता जनसेवा प्रतिष्ठाणची परीक्षा टीम प्रत्येक मंडळांपर्यंत पोहचणार आहे.
दौंड तालुक्यातील तरुणांमध्ये लोकप्रिय झालेले जनसेवा प्रतिष्ठाण आयोजित गणराया आवार्ड २०२३ यंदाही मोठया दिमाखात होणार आहे. सर्वच मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेश मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
https://forms.gle/G13CzAcWhvZmJ1Gk8