राहुल अवचर
देऊळगावराजे (दौंड) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन आणि ग्रामपंचायत देऊळगावराजे यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या देऊळगाव राजे येथील दोन महिलांना सन्मानित करण्यात आले.
येथील अंगणवाडी सेविका कुंदा दादासो भोसले आणि देऊळगावराजे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा प्रिया तात्यासो केदारी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या दोघींनी मागील अनेक वर्षापासून विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना राज्य शासनाच्या योजनांचा लाभ अनेक कुटुंबांना मिळवून दिला असून यापुढेही असेच काम करत राहणार असल्याचे भोसले आणि केदारी यांनी सांगितले.
यावेळी सरपंच स्वाती गिरमकर, शुभांगी गिरमकर,ग्रामपंचायत सदस्य बाबु पासलकर,ग्रामविकास अधिकारी अमीर शेख, आप्पासाहेब खेडकर, भरत गिरमकर,असिफ इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते