दौंड | केडगाव-बोरिपार्धी येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

केडगाव (दौंड) : पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट पहायला मिळत असून काही ठिकाणी वीज पडून नागरिकांचा मृत्यूही होताना दिसत आहे.

अशीच एक घटना दौंड तालुक्यातील केडगाव-बोरिपार्धी येथे घडली असून संजय जगन्नाथ जगताप (वय 50, रा. मगरमाळा, बोरीपार्धी ता.दौंड) या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे. ही घटना बोरिपार्धी येथील शेतजमीन गट नंबर 168/2 येथे सायंकाळी 4:30 ते 5.00 च्या दरम्यान घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती दौंडचे तहसीलदार अरुणकुमार शेलार यांनी दिली आहे.