दौंड | दहावीची परीक्षा दिलेल्या पिलानवाडी येथील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

दौंड : दहावीची परीक्षा दिलेल्या एका 17 वर्षीय मुलाने घराशेजारील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील पिलानवाडी (राहू) येथे घडली आहे. याबाबत मृत मुलाचे चुलते आप्पा हनुमंत मोरे यांच्या खबरीवरून यवत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 12/04/2023 रोजी दुपारी 12ः00 वा. च्या सुमारास खबर देणार आप्पा मोरे हे पिंपळगाव येथे असताना त्यांना त्यांचा पुतण्या राहुल शिवाजी मोरे याने फोन करून प्रेमकुमार शिवाजी मोरे याने घराशेजारी असणारे गोठ्यामधील लोंखडी अँगलला दोरीने गळफास घेतला असल्याचे सांगितले. तेव्हा आप्पा मोरे हे लगेचच पिंपळगाव वरून पिलानवाडी येथे त्यांचा भाऊ शिवाजी हनुमंत मोरे यांच्या घरी गेले.

त्यावेळी तेथे जमलेल्या लोकांनी त्यांचा पुतण्या प्रेमकुमार मोरे याचा गळफास काढुन त्यास खाली उतरवले. त्यानंतर प्रेमकुमार यास ॲम्ब्युलन्स मधुन यवत ग्रामीण रूग्णालय येथे आणले असता डॉक्टारांनी त्यास तपासून मयत घोषित केले. प्रेमकुमार मोरे या मुलाने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. त्याने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप समजू शकले नाही. यवत पोलिस अधिक तपास करीत आहेत.