पुणे : दादा, आप देर से आये मगर आगये, आपकी सही जगह यही थी असे म्हणत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी अजित पवारांचे स्वागत केले. ते पुण्यातील एका कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
अमित शाह यांनी आपल्या भाषणावेळी बोलताना, पुण्याला सहकाराची पंढरी म्हटलं जातं आणि देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा 42% टक्के आहे. त्यामुळे उद्घाटनासाठी आपण पुण्याची निवड केल्याचं त्यांनी यावेळी म्हटले आहे.
भाषणाच्या सुरुवातीला अमित शाह यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाहत, दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमाला आले असून माझ्यासोबत ते पहिल्यांदाच बसलेले आहेत, त्यामुळं सर्वात आधी मी त्यांना सांगू इच्छितो की, अजित दादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहेत. तुमची हीच तुमची योग्य जागा आहे, याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीर केला, मात्र योग्य निर्णय घेतला असं त्यांनी म्हणताच अजित पवार यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दोन्ही हात जोडून अभिवादन केले.
अमित शाह यांनी महाराष्ट्र राज्याची स्तुती करताना, सहकारात देश एका बाजूला आहे आणि महाराष्ट्र एका बाजूला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा 42 टक्के आहे. महाराष्ट्राचं हेच योगदान दाखवण्यासाठी मी इथं सर्वांना घेऊन आलो आहे, असं ते म्हणाले.
साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मित गरजेची
महाराष्ट्रा राज्यातील विविध जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये इथेनॉलची निर्मिती व्हायलाच हवी असे मत यावेळी अमित शाह यांनी व्यक्त केले.
याबाबत पुढे माहिती देताना त्यांनी, आम्ही कायदा बदलून सहकार मतदारांना अधिकार दिले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक साखर कारखान्यात इथेनॉलची निर्मिती व्हायलाच हवी. यासाठी राज्य सरकारने पावलं उचलावीत. अशा सूचना मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुखमंत्र्यांनी आज सकाळच्या बैठकीतच दिलेल्या आहेत, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.