CRPF कॅम्पमध्ये गोळीबार, 4 जवान ठार, 13 जखमी

छत्तीसगड : सुकमा येथे CRPF जवानाने आपल्याच साथीदारांवर गोळीबार केला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण कॅम्पमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना छत्तीसगडमधील सुकमा येथे असलेल्या मरईगुडा येथील लिंगानापल्ली कॅम्पमध्ये घडली असून एका सीआरपीएफ जवानाने आपल्या 50 वी बटालियनच्या सहकारी जवानांवर गोळीबार केल्याने या घटनेत 4 जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 13 जवान गंभीर जखमी झाले आहेत.
या जवानाने गोळीबार का केला याचे कारण अजून स्पष्ट झाले नसून हल्ला झाल्यानंतर जखमी जवानांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.