दौंड : पक्षपात, जातीवाद, कारखाना, टिका टिप्पनी, खोटा प्रचार इतके करूनही गेल्या दहा वर्षांत आमदार राहुल कुल यांनी केलेल्या कामांचा पगडा भारी पडू लागल्याने आता विरोधक थेट दिवंगत आमदार कै.सुभाष अण्णा कुल यांच्यावरच घसरू लागले आहेत.
सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या काही क्लिपमध्ये विरोधकांनी निवडणूक काळापुरते पाळलेले काही महाभाग आता कुल कुटुंबाला वयक्तिक लक्ष करू लागले असून हे प्रकार जनता कधीही सहन करणार नाही, मतातून भांबवलेल्या विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्यात येईल असा ईशारा कुल गटाकडून दिला जात आहे.
निवडणूक म्हटले की आरोप प्रत्यारोप आलेच. मात्र पुढील उमेदवार आपल्या भाषणामध्येही सुसंस्कृतपणा जपत असल्याचे पाहून काही विरोधकांनी चेव फुटल्यासारखे समोरील उमेदवाराच्या घरादारावर आरोप करून कसेही करून या परिवाराला बदनाम कसे करता येईल आणि आपला ‘विजय’ कसा होईल याचा पुरेपूर प्रयत्न चालवला जात आहे. विद्यमान आमदार राहुल कुल हे विकासकामांच्या जोरावर निवडणूक लढवत असताना तालुक्यात विकासकामे झाली नाहित, भीमा पाटस कारखाना कसा सुरु झाला हे मुद्दे पुढे करून तालुक्याचा विकास करण्यासाठी निवडून द्या असे म्हणत विरोधक निवडणूक लढवत आहेत. मात्र हे सर्व होत असताना निवडणूक प्रचाराने हीन दर्जाची पातळी गाठल्याचे पहायला मिळत आहे. आमदार काय असतो, त्याचा मान काय असतो आणि टिका, टिप्पणी करायला एक मर्यादा असते हे विजयाच्या लालसेने हापापलेले विरोधक विसरले आहेत अशी टिका आता जनतेतून होत आहे.
आपला विजय होण्यासाठी विरोधक अतिशय खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर करू लागले आहेत. विधानसभेचे उमेदवार राहुल कुल यांच्या कुटुंबावर खालच्या दर्जाची भाषा वापरून सोशल मीडियावर त्यांची बदनामी केली जात आहे. त्यामुळे यांच्या हातात सत्ता आली तर हे तालुक्यात पुन्हा रक्त रंजित इतिहास लिहिणार की काय अशी भीती आता व्यक्त केली जाऊ लागली आहे. तोंड आणि हाताला लगाम असावी अन्यथा याच दोन गोष्टी मानवाच्या प्रगतीला उतरती कळा लावतात. मात्र ज्यावेळी कायम पराजय हाती आलेला असतो त्यावेळी विजयाने आसूसलेली आत्मा ही कोणतेही कृत्य करण्यास मागे पुढे पाहत नाही. काहीही करून विजय मिळवायचाच या लालसेने आता विरोधकांनी भाषेची पातळी सोडून बिन बुडाचे आरोप, टिका, टिप्पणी करण्यास सुरुवात केली आहे.
विरोधकांनी बाहेरून आणलेले काही वक्ते ज्यावेळी टिका करतात त्यावेळी त्यांना उत्तर दिले की हेच विरोधक राहुल कुल यांच्या बोलण्याचा अर्थाचा अनर्थ काढून लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसत आहे. त्यामुळे तालुका नेमका कुणाच्या हातात द्यायचा आणि तो सुरक्षित ठेवण्यासाठी आता जनताच पुढाकार घेईल असेही कुल गटाकडून सांगितले जात आहे.