दौंड : काल दौंड पोलिस स्टेशन हद्दीतील 7 जण तडीपार केल्याची घटना ताजी असतानाच आज यवत पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या मानकोबावाडा येथे राहणारे सराईत गुन्हेगार नामे १) अक्षय लालु लकडे २) शुभम बाळु लकडे ३) बाळु उर्फ भाउ आबा लकडे ४) विशाल नंदु खताळ ५) सागर ठकु खताळ ६) खंडु धनाजी ठोकळे ७) रोहित गोपिनाथ गवळी (सर्व रा. मानकोबावाडा यवत ता दौंड जि. पुणे ) तसेच ८) गौरव नामदेव अवचर (रा. उरुळी कांचन ता हवेली जि.पुणे) या सराईत गुन्हेगारांना पुणे, पिंपरी चिंचवड सातारा जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली आहे.
वरील आरोपींविरुद्ध यवत पोलीस स्टेशनला शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करुन दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत सदर गुन्हेगारांनी आपली गुन्हेगारी टोळी तयार करुन सर्वसामान्य नागरकिांमध्ये दहशत माजवुन गंभीर स्वरुपाचे गुन्हेगारी कृत्य करत होते. त्यांच्यावर वेळोवेळी
कायदेशिर कारवाई करुनही त्यांच्या गुन्हेगारी वर्तनात फरक पडला नाही त्यामुळे त्यांच्या गुन्हेगारी कृत्यास कायमस्वरुपी आळा घालण्यासाठी सदर टोळी विरुध्द म.पो.का. क ५५ प्रमाणे हद्दपार करणेबाबतचा प्रस्ताव यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली मपोना/सोनल शिंदे यांनी तयार करुन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्फतीने मा. पोलीस अधिक्षक श्री. अंकित गोयल यांना सादर केला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक श्री अंकित गोयल यांनी सदर इसमांना दि ०६/०५/२०२३ रोजी
संपुर्ण पुणे ग्रामीण जिल्हा, पिंपरी चिंचवड आयुक्तालयासह सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामधून सहा महिण्याच्या कालावधी करीता तडीपार करण्यात आले असल्याबाबतचे आदेश पारीत केलेले आहेत. सदरचा आदेश लागु झाल्यापासुन सदर इसमांनी वरील जिल्हा व तालुक्यामधुन तडीपार करण्यात आले आहे. सदर चे
इसम कोणाला हद्दपार करण्यात आलेल्या तालुक्यांमधुन दिसुन आल्यास यवत पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.