दौंड : सहकारनामा ऑनलाइन
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे विना मास्क वाहन चालकांवर कारवाई करत असताना पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ करणाऱ्या तिघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संजय रामचंद्र देवकाते, पो ना ब.नं १००३ नेमणूकदौंड पोलीस स्टेशन (अंकीत
रावणगाव पोलीस दुरक्षेत्र) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी १) विलास शहाजी कु-हाडे २) रविद्र शहाजी कुऱ्हाडे ३) आशा शहाजी कुऱ्हाडे
यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि २९/०९/२०२० रोजी दुपारी १:३० वा.च्या सुमारास स्वामी चिंचोली या गावच्या हद्दीमध्ये पुणे सोलापुर हायवे रोड लगत मल्लीनाथ मठ यु टर्न जवळ फिर्यादी व त्यांचे सहकारी पो.ना.मलगुंडे, पो.ना.होले, पो.कॉ. सय्यद, होमगार्ड राउत, भोसले, गोळे हे स्वामी चिंचोली गावच्या हददीत
मल्लीनाथ मठ येथे विना मास्कची कारवाई करीत असताना आरोपींनी विना मास्कची पावती करण्याच्या कारणावरून इतर दोन आरोपींना बोलावुन घेतले.
इतर दोन आरोपी हे घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांजवळ येवुन मी पावती करणार नाही, ये पोलीसांनो तुम्हाला लय माज आला आहे का, तुम्ही माझी पावती करता काय, असे म्हणत पोलीस स्टाफच्या अंगावर आले आणि तुम्ही रावणगाव येथे कशा नोकऱ्या करता, मी तुम्हाला नोकरी करून देणार नाही असे म्हणून दहशद निर्माण करून मोठ मोठयाने आरडा ओरडा केला.
यानंतर सर्वांनी मिळून पोलिसांना शिवीगाळ करून आरोपी विलास व रविंद्र यास ताब्यात घेत आसताना फिर्यादी यांना धक्काबुक्की करून सरकारी काम करीत असताना सरकारी कामात अडथळा आणुन आम्ही पावती करणार नाही असे
म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत.