मौज मजेसाठी शेतकऱ्याच्या गाई चोरणारा भामटा जेरबंद

पुणे : मौज मजेसाठी शेतकऱ्याच्या गाई चोरणाऱ्या भामट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (Lcb) ने सापळा रचून जेरबंद केले आहे.

कोळविहरे गाव आणि भोंगळे वस्ती (ता.पुरंदर) येथून काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या गाई चोरीस गेल्या होत्या. त्यानुसार जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरच्या गाई शिवरी येथील शुभम जगताप (रा. शिवरी) या आरोपीने चोरल्या असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला समजले होते. आरोपी शुभम हा जेजुरी येथे मेन चौकात येणार असल्याचे समजताच पोलीस पथकाने सापळा रचून शुभम बाळू जगताप (वय १९ वर्षे रा शिवरी ता पुरंदर जि पुणे) यास ताब्यात घेतले. त्याकडे अधिक विचारपूस केली असता जेजुरी पोलिस स्टेशन हद्दीतील कोळविहरे, आणि भोंगळे वस्ती येथिल गाई त्याने त्याचा मित्र हरिभाऊ दळवी (रा. नाझरे ता पुरंदर जि पुणे) याच्या सोबत चोरून त्यातील एक गाई जवळर्जुन येथे तर एक गाई बारामती येथे जनावर बाजारात विकली असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांना जवळर्जुन येथून एक गाई मिळून आली.तर अन्य गाईचा शोध सुरू आहे.
सदरील आरोपी याने त्याचा मित्रासोबत भोंगळे वस्ती येथील एक बंद घरफोडून एक lcd टीव्ही चोरी केल्याचेही सांगितले आहे.
आरोपीला पुढील तपासकामी जेजुरी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख सो, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते ,पोलिस उप अधिक्षक धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके
पो स ई शिवाजी ननवरे
पो हवा बाळासाहेब कारंडे
पो हवा अजय घुले
पो हवा विजय कांचन
पो कॉ धिरज जाधव यांनी केली आहे.