Categories: Previos News

Crime – येरवडा जेलमधून बाहेर येताच गुंडाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, लोणीकाळभोर परिसरातील घटना



लोणीकाळभोर : सहकारनामा (हनुमंत चिकणे)

येरवडा जेलमधून काही दिवसांसाठी पॅरोलवर बाहेर आलेल्या गुन्हेगाराकडून एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत, तिचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी (ता.०७) कदमवाकवस्ती (ता. हवेली ) येथे दुपारी उघडकीस आला आहे. सचिन सुभाष कदम असे या आरोपीचे नाव आहे. 

याप्रकरणी पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लोणी काळभोर पोलीसांनी सचिन सुभाष कदम ( वय. ४५, रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली) याच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.  

दरम्यान, गुन्हा दाखल होण्यापुर्वीच आरोपी सचिन कदम फरार झाला होता. मात्र पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी आरोपींला दीड तासाच्या  आत अटक करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी गुरुवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास एकटीच घऱी होती. मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून सचिन कदम याने संबधित मुलीच्या घरात प्रवेश केला. तसेच तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न सुरु केला. यावेळी संबधित मुलीने ओरडण्याचा प्रयत्न केला असता, सचिन कदम याने संबधित मुलीचे तोंड हाताने दाबले. तसेच तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. मात्र मुलीने सचिन कदम याच्या हातातुन निसटण्याचा प्रयत्न करताच, सचिन कदम याने घराबाहेर पळ काढला. व जाताना घराबाहेर असलेली दुचाकीचा आरसा फोडला. 

सचिन कदम दुर गेल्याची खात्री पटताच, मुलीने आपल्या नातेवाईकांशी फोनवरुन संपर्क साधुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तात्काळ लोणी काळभोर पोलिसात जाऊन, सचिन कदम याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर करत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

5 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

7 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

9 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago