Corona : कासुर्डी आणि भांडगावमध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले, 5 जणांना कोरोनाची लागण



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे. काही दिवसांमध्ये विविध गावांमध्ये कोरोना रुग्ण सापडू लागले आहेत त्यामुळे आता नागरिकांनी सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे.

दि.25/11/2020 रोजी कोविड 19 साठी यवत ग्रामिण रुग्णालयातर्फे 85 स्वॅब पाठविण्यात आले होते. या 85 स्वॅबमध्ये 23 शिक्षक तर रूटीन रूग्ण 22 होते.

 यात सर्व शिक्षक निगेटिव्ह आले असून 62 पैकी रूग्ण कासुर्डी  04, भांडगाव 01 असे 5 रुग्ण आढळून आले आहेत.

यात पुरुष 1 तर  महिला रुग्ण 4 आहेत. या सर्वांचे वय 62 ते 37 दरम्यान आहे. याबाबतची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली.