नानविज पोलिस प्रशिक्षण केंद्रात दिक्षांत समारोह उत्साहात संपन्न, प्रशिक्षाणार्थी, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह

दौंड : दौंड तालुक्यातील नानविज पोलिस प्रशिक्षण केंद्रात ४४ वा दिक्षांत समारोह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दि.०७/०८/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वाजता पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज येथे हा समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. राजकुमार व्हटकर (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची उपस्थिती लक्षणीय होती. दिक्षांत संचलनाचे नेतृत्व प्रशिक्षणार्थी मंगेश अनुरथ मंगर यांनी केले. यावेळी प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी प्राचार्य रघुनाथ शिंदे यांनी दिक्षांत संचलनाचा तसेच प्रशिक्षण केंद्राचा वार्षीक अहवाल वाचन करुन संस्थेच्या एकदंर कामकाजाची माहीती दिली.

सदर संचलन समारंभास श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, (समादेशक SRPF Gr. ७ दौंड) गणेश बिरादार, )समादेशक SRPF Gr. ५ दौड) दिलीप खेडेकर समादेशक, (SRPF Gr. १९ कुसडगाव) रामचंद्र केंडे, प्राचार्य, SRPF प्रशिक्षण केंद्र, नानवीज- दौंड, मुंबई, दौंड परीसरातील शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थी तसेच पोदार स्कुलचे प्राचार्य हे विशेष करुन उपस्थित राहीले. यावेळी प्रशिक्षणार्थिंचे नातेवाईक, जेष्ठ नागरीक, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू व पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सर्व अधिकारी, प्रशिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

प्रमुख अतिथी मा. व्हटकर सर यांनी सर्व यशस्त्री प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रशिक्षणार्थींचे दिमाखदार संचलन, पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज- दौंड येथे राबविलेले विविध उपक्रम, मॉडेल पोलीस स्टेशन, ट्राफिक पार्कचे आधुनिकीकरण व नव्याने शिकविण्यात आलेले वाचन,लेखन,कौशल्ये, भावनिक प्रज्ञावंत पोलीस इ. उत्कृष्ट कामकाजाबाबत प्राचार्य तसेच त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी व प्रशिक्षक अंमलदार यांचे कौतुक केले. तसेच वृक्षारोपण रक्तदान शिबीर, दत्तक गाव योजना, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्लास्टीक मुक्त परिसर इ. पर्यावरण पूरक विविध उपक्रम राबविल्याने संस्थेच्या कामकाजाबद्दलही कौतुक केले.

पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज येथे कृतीशील प्रयोगाच्या माध्यमातून तयार झालेला अष्टपैलू पोलीस कर्तव्यनिष्ठेने समाजाचे रक्षण करून महाराष्ट्र पोलीस दलाची शान नक्कीच उंचावेल व पोलीसांचे “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीद वाक्याला साजेसे वर्तन ठेवेल असा विश्वास व्यक्त केला. मा. प्रभारी प्राचार्य तसेच श्रीमती डॉ. सई भोरे पाटील उपप्राचार्य यांचे मार्गदर्शन व नियोजनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी या सत्रात विविध विभागात उत्तम कामगीरी करुन सन्मान मिळविला.

त्यामध्ये अंतरवर्ग प्रथम व अष्टपैलू प्रशिक्षणार्थी म्हणून कुमार विठोबा शिंदे (मुंबई शहर) बाह्यवर्ग प्रथम शुभम पुरुषोत्तम शिंदे ( ठाणे ग्रामीण) गोळीबार प्रथम क्रमांक अमन परमानंद चौव्हाण (मुंबई शहर) उत्कृष्ठ खेळाडू अमोल पोपट गव्हाणे  (मुंबईशहर) तसेच या प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड (उत्कृष्ट सत्र समन्वयक) शैलेंद्र भुरण (उत्कृष्ठ आंतरवर्ग अधिकारी) दिलीप वाळके RSI व संतोष सोळंक (उत्कृष्ट ब्राह्यवर्ग कामकाज) तसेच पोहवा जीवन पाचपुते, किरण शिंदे  लिपीक, जयरामशिंदे कार्या. ना. शिपाई, विठोबा गावडे (भोजनसेवक) कस्तुरा वराळे, सफाईगार यांना त्यांच्या विभागामध्ये उत्कृष्ठ कामकाज केल्यामुळे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

या दीक्षांत संचलनयावेळी सत्र क्र. ४४ मधील स्मृतींना उजाळा देणारी ” सारथी ” ही स्मरणीका मा.प्रमुख अतिथी यांचे हस्ते प्रदर्शित करण्यात आली. प्रमुख अतिथी, निमंत्रित मान्यवर, पत्रकार बंधु व नातेवाईक तसेच दीक्षांत संचलन यशस्वी करण्यासाठी ज्या ज्ञात अज्ञात व्यक्ती व संस्था यांनी मदत केली त्यांचे आभार या प्रशिक्षण केंद्राच्या उपप्राचार्य, श्रीमती डॉ. सई प्रताप भोरे पाटील यांनी मानले.