केडगाव (दौंड) : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान केडगाव यांच्या माध्यमातून योग्य संस्कारी, सुदृढ व आज्ञाधारक पिढी घडावी याकरीता प्रतिष्ठानचे अध्यक्ष मल्हारी सोडनवर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या बालसंस्कार शिबिरामध्ये मुंबई, पुणे, सोलापुर, अहिल्यानगर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, शिरूर या ठिकाणच्या नव्वद मुलामुलींनी सहभाग घेतला होता.
या बाल संस्कार शिबीरामध्ये सर्व मुलांना विवीध प्रकारचे व्यायाम, योगा, प्राणायाम, मेडीटेशन, झुंबाडान्स, लगोरी, खोखो, आट्या पाट्या, क्रिकेट, स्विमिंग, ट्रेकिंग, चित्रकला, दांडपट्टा, हार्मोनियम, पखवाज, तबला, सुंदर हस्ताक्षर लेखन, संभाषण कौशल्य, स्वयंसिस्त, करिअर मार्गदर्शन असे विविध खेळ आणि विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व मुलांना विविध विषयांचे ज्ञान देण्यासाठी मल्हारी सोडनवर, सुनिल माने सर, ह.भ.प.दिनकर महाराज देवडकर, दिपाली इंगुळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
तर सुंदर हस्ताक्षर कसे काढावे याकरीता पाटील जाधव सर, मिलींद टेंगले सर, फासगे सर, चव्हाण सर व त्यांच्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. योगा व प्राणायामसाठी आदित्य शितोळे व टीमने मार्गदर्शन केले. सुनिल सुपनर सर व ज्योती देशमुख यांनी मुलांना विवीध खेळ शिकवले. यावेळी संस्थेच्या परिसरात विध्यार्थ्यांकडुन विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. या शिबीरासाठी परिसरातील अनिल गडधे, निलेश ताडगे, ज्ञानदेव मेमाणे, सुरेश टेंगले, लखन गिरी, राजेश करडे, ललीत गायकवाड यांनी अन्नदान केले.
भुलेश्वर येथे ट्रेकिंगला जाण्यासाठी आदर्श ट्रॅव्हल्स चे मालक बंडू नेवसे यांनी बस उपलब्ध करून दिल्या तर स्विमिंगसाठी हॉटेल रॉयलचे मालक सतीश बारवकर (माजी उपसरपंच केडगाव) यांनी स्विमिंग पुल उपलब्ध करून दिला. सांगता समारंभावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निवृत्त पुणे जिल्हा शिक्षणाधिकारी श्री.सिद्धार्थ चव्हाण यांनी बोलताना, जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर अथक परिश्रम करून स्वावलंबी बनावे लागेल असा संदेश दिला तर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मल्हारी सोडनवर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, सुसंस्कारी पिढी घडविण्या करीता मुलांबरोबरच पालकांनी सुद्धा स्वतः स्वयंशिस्तीचे पालन करून त्यांना नित्यक्रम देऊन त्यांच्याकडून ते करून घेतले पाहीजे असा संदेश दिला. प्रतिष्ठानने पंढरपुर येथे दिंडीसाठी जागा खरेदी केली असुन दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करण्याचे अवाहन यावेळी त्यांनी केले.
ह.भ.प.दिनकर महाराज देवडकर यांनी मुलांकडून आई वडिलांची पाद्य पुजा करवून घेतली त्यावेळी अनेक पालक व विद्यार्थ्यांना गहिवरून आले. शिबीर यशस्वी व्हावे याकरीता संस्थेचे कार्याध्यक्ष चिमाजी नरूटे, खजिनदार चंद्रकांत गडदरे, सचिव हरिभाऊ हंडाळ, उपाध्यक्ष माऊली ठोंबरे, संचालक सतीश हंडाळ, मेमाणे साहेब, तळेकर गुरूजी, चंद्रकांत जगताप, संतोष सोडनवर, सुखदेव शेंडगे, आशोक गोबरे यांनी विशेष परिश्रम घेतले.