औरंगाबाद
मला कारणे सांगू नका, तातडीने मार्ग काढा. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे. नवीन योजना पूर्ण होईपर्यंत कालावधी लागेल. त्यामुळे सध्या किती आणि कसे पाणी वाढवून देता येईल याकडे लक्ष द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी दिले आहेत.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना, औरंगाबाद शहर पाणी पुरवठ्याची १६८० कोटी रुपयांची योजना गतीने पूर्ण व्हावी म्हणून या योजनेचा ‘मुख्यमंत्री संकल्प कक्षा’तून कालबद्ध रितीने आढावा घ्यावा आणि या योजनेतील उणिवा प्राधान्याने दूर करा. या योजनेला राज्य शासन काहीही कमी पडू देणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कामाबाबतच्या तक्रारीवरून त्यांनी, औरंगाबाद शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेचे कंत्राटदार संथ गतीने काम करीत असल्याच्या तक्रारी आहेत, ही अतिशय गंभीर बाब आहे. कंत्राटदाराने कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास विविध कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी दिला.