मुंबई : (वृत्तसंस्था)
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची (सीआयडी) वेबसाईट हॅक करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर पसरल्याने राज्यभरात खळबळ माजली आहे. मात्र सीआयडीकडून नवीन वेबसाईट तयार
करण्यात येत आहे. त्याची टेस्टिंग करण्यात येत होती. त्यावेळी वेबसाईट हॅक होते का हे पाहिले गेले आहे असे सीआयडीकडून सांगण्यात आले आहे. पुण्यातील पाषाण परिसरात राज्य गुन्हे अन्वेषण विभाचे प्रमुख कार्यालय आहे. क्लिष्ट आणि तपास न लागलेले तसेच गंभिर गुन्ह्यांचा तपास करण्यात येतो. दरम्यान सीआयडीची अधिकृत असणारी वेबसाईट आहे. तसेच नवीन एक वेबसाईट तयार करण्यात येत आहे. ही वेबसाईट हॅक होते का हे पाहणे सुरू होते. दरम्यान सकाळी टेस्टिंग सुरू असतानाच वेबसाईटचा हॅक झालेला फोटो व्हायरल झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. या फोटोत भारतीय पोलीस आणि मोदी सरकारने मुस्लीम नागरिकांना त्रास देऊ नये असा संदेश त्यात देण्यात आला होता. याबाबत सीआयडीचे प्रमुख कुलकर्णी यांना विचारले असता असे काही झाले नसल्याचे सांगण्यात
आले आहे.