‘न्यू अंबिका’ कला केंद्रामध्ये नाताळ सण उत्साहात साजरा

दौंड : न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र (चौफुला, वाखारी ता. दौंड) येथे या वर्षीही नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राज्य थिएटर संघाचे अध्यक्ष तथा न्यू अंबिका कला केंद्राचे संचालक डॉ. अशोक जाधव, संचालिका सौ. जयश्री ताई अशोक जाधव यांनी सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळ निमित्त अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्राने विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवत आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र हे सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभाग होत आले असून या सांस्कृतिक कला केंद्रामध्ये प्रत्येक जाती-धर्माचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

न्यू अंबिका कला केंद्रामध्ये हिंदू धर्मियांचे गणपती, दिवाळी, वारकरी सेवा, मुस्लिम धर्मियांची न्याज, कंदुरी, ईद तसेच ख्रिस्ती बांधवांचा नाताळ इत्यादी सण येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत हे विशेष. सुरुवातीपासूनच आपली ‘सर्व धर्म समभाव’ ही सामाजिक ओळख या सांस्कृतिक कला केंद्राचे मालक अशोकबाबा जाधव हे जपत आले आहेत. याच धर्तीवर 25 डिसेंबर 2024 रोजी ‘नाताळ’ हा सण येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

नाताळ निमित्त न्यू अंबिका कला केंद्राच्या आवारात ‘ख्रिसमस ट्री’ उभारण्यात आला होता. या ‘ख्रिसमस ट्री’ ला आकर्षक विद्युत रोषणाईने मढविण्यात आले होते. यावेळी अशोकबाबा जाधव तसेच या संस्कृतिक कला केंद्राच्या संचालिका जयश्रीताई जाधव यांसह या कला केंद्रातील लावणी कलावंत आणि नर्तीकांनी दीप प्रज्वलन आणि मेणबत्त्या लावून ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या.